Event Details

मराठी वाचन दिवस - २०२१

मराठी वाचन दिवस - २०२१

19 June,2021

दि एज्युकेशन सोसायटीचे,


पी. डी. कारखानीस महाविद्यालय, अंबरनाथ


मराठी भाषा साहित्यामध्ये वाचन कलेच्या संस्कृतीची एक समृद्ध परंपरा आहे. विचार, वाणी आणि उच्चार यांचे संस्कारशील असे पिळदार वळण येण्यासाठी जुन्या काळात मोठ मोठे ग्रंथ मुखोद्गत करण्याची स्पर्धा चालत असे.

परिणामी यातून वेगवेगळ्या विद्याशाखांचे विद्वान पंडित निर्माण होत होते. हीच परंपरा पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या नीती आयोगाने दि. १९ जून हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे.

आपल्या महाविद्यालयातील मराठी वाड्.मय मंडळ व ग्रंथालय समितीच्या वतीने वाचन दिनानिमित्त सप्तरंग वाचनाचे...! हा श्रवणीय कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे .

कार्यक्रमाचा तपशील:

दिनांक : १९/०६/२०२१

वेळ : सायं.५.०० ते ६.००

माध्यम - ऑनलाईन (गूगल मीट)

विशेष टीप : नियोजित दिवशी कार्यक्रमाची लिंक बरोबर सायंकाळी ठीक ४:४५मिनिटांनी ग्रूपवर दिली जाईल. कार्यक्रम वेळेत सुरु करण्याचा दृष्टीने सर्वांनी पाच मिनिटे अगोदर जॉईन होण्याचा प्रयत्न करावा.

डॉ. संदीपान नवगिरे (मराठी वाड्.मय मंडळ)

प्रा. संजय निचिते (ग्रंथालय समिती)

डॉ. वंदना पुरव (प्र-प्राचार्या)