Event Details

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा - २०२१

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा

01 Aug,2021

दि एज्युकेशन सोसायटीचे,


पी. डी. कारखानीस महाविद्यालय, अंबरनाथ


'पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे,' असं ठणकावत मनामनात क्रांती करणाऱ्या साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा १ ऑगस्ट हा जन्मदिवस! मराठी साहित्य, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यातील अण्णा भाऊंचे योगदान अतुलनीय आहे.

अण्णा भाऊंचे हे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा घेत आहोत, यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, ही विनंती.

प्रश्नमंजुषेची लिंक ०१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आपणास देण्यात येईल. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लिंक सुरु असेल. त्यानंतर आपोआप लिंक बंद होईल.

प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आपणास आपल्या ईमेलवर ई-प्रमाणपत्र मिळेल

डॉ. संदीपान नवगिरे (मराठी विभागप्रमुख)

प्रा. संजय निचिते (समन्वयक )

डॉ. वंदना पुरव (प्र-प्राचार्या)